Khandesh Darpan 24x7

सावदा नगरपरिषद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती उत्साहात साजरी...


प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी 

भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई  फुले यांची आज 192 वी जयंती. त्यांचे विचार, त्याची शिकवण ही नेहमीच सर्वांसाठी विशेषत: महिलांना प्रेरणा देणारी आहे. समाजातील रूढी, परंपरा बाजूला सारून, लोकांचा रोष  पत्करून त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना साक्षर केले आणि पुढे जाऊन याच सावित्रीबाईंनी बुरसटलेल्या विचारांच्या लोकांमध्ये जाऊन अनेक महिलांना एकत्र करुन त्यांनाही साक्षर केले. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने त्यांनी पुढे नेला.

अशा या हुशार, कतृत्ववान, जिद्दी सावित्रीबाईं फुले यांची 192 वी जयंती आज मंगळवार रोजी सावदा नगर परिषद येथे उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योतीला अभिवादन करण्यात आले. 


यावेळी नगर परिषद चे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, यांचे सुचने नुसार स्त्री शक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी लेखापरीक्षक भारती पाटील यांचे हातून सावित्रीबाईं फुले यांच्या फोटोला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी लेखापाल विशाल पाटील, आरोग्य निरीक्षक महेश चौधरी, अरुणा चौधरी, विमलेश जैन, विनय खक्के, सतीश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم