खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता चेक बाऊन्स झाल्यास होणार मोठी शिक्षा तसेच काही नवीन नियम देखाली जरी करण्यात आले आहे.
पहा काय आहेत नवीन नियम -
चेक बाऊन्सच्या नियमानुसार ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसल्यास त्याच्या दुसऱ्या बँक खात्यातून ही रक्कम कपात करण्यात येणार आहे, तसेच धनादेशाद्वारे ग्राहक पेमेंट करणार असेल तर त्याच्या खात्यात शिल्लक रक्कम असणे अनिवार्य करण्यात येणार आहे .
याचबरोबर धनादेशावरील रक्कमे इतकी रक्कम खात्यात नसेल तर संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, याशिवाय बँकखाते देखील बंद करण्यात येईल आणि नवीन बँक खाते उघडण्यासही मनाई करण्यात येणार आहे.
सध्या चेक बाऊन्स धनादेश अनादर प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होतो तसेच ज्याची फसवणूक झाली, त्याला दुप्पट रक्कम परत करावी लागू शकते तसेच अशा व्यक्तीला दोन वर्षांचा कारावास देखील होऊ शकतो.
إرسال تعليق