Khandesh Darpan 24x7

सावदा ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नांव देण्यात यावे - राजेंद चौधरी (मा. नगराध्यक्ष )

प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी


सावदा ता. रावेर जिल्हा जळगांव येथील महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सदरील ग्रामीण रुग्णालयाची जागा नगरपालिकेने मोफत महाराष्ट्र सरकारकडे वर्ग केलेली आहे. जागा वर्ग करतेवेळी जो ठराव संमत करण्यात आला आहे त्या ठरावानुसार सदरील रुग्णालयास त्यावेळी असलेले राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नांव देण्यात यावे असे म्हटले आहे व त्या ठरावानुसार महाराष्ट्र सरकारने ती जागा हस्तांतरीत केली आहे. म्हणून आपण त्या ठरावानुसार नविन बांधकाम करण्यात येत असलेल्या ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे नावे देण्यात यावे असा मागणी अर्ज सावदा येथील मा. नगराध्यक्ष राजेंद चौधरी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना दिला असून सदर प्रत सदर जिल्हाधिकारी साहेब जळगांव तसेच मुख्याधिकारी साहेब सावदा न. पा. यांना दिलेली आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم