प्रतिनिधी : प्रदीप कुळकर्णी | राजेश चौधरी
सावदा येथील श्री.नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयाची शैक्षणिक सहल नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
गेल्या ३/४ वर्षांपासून कोरोनाच्या संभाव्य भीती पोटी संपूर्ण राज्यच नव्हे तर देशात सुद्धा विद्यार्थ्यांच्या सहलींवर बंदी असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून मात्र यावरील निर्बंध उठविले गेल्याने आता सगळी कडे सहलींचे आयोजन केले जात आहेत. त्या नुसार सावदा येथील एस एन वी एच पी विद्यालयाची सहल पाटणादेवी, म्हाळसादेवी (चाळीसगाव) येथे आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस ने सर्व विद्यार्थिनींना नेण्यात आले, आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन देखील करण्यात आले होते. सहली दरम्यान विद्यार्थिनींसाठी जेवणासाठी भडगांव पंचायत समिती चे बी. ओ. वाघ साहेब, परदेशी साहेब, मनोज देवरे, सागर वंजारी यांनी हॉल उपलब्ध करून दिला.
सहली साठी सावदा न.पा.चे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, रावेर पं. स. चे दखणे, रावेर एस. टी. डेपो मॅनेजर यांचे सहकार्य लाभले. सहली दरम्यान मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, निर्मला बेंडाळे, राधारानी टोके, संजय भोई आणि सचिन सकळकळे उपस्थित होते.
إرسال تعليق