Khandesh Darpan 24x7

शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर - प्राचाऱ्यांवर वाढला कामाचा ताण



प्रतिनिधी :     राजेश चौधरी   |     प्रदीप कुळकर्णी  


महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आर.बी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून काम बंद आंदोलन करत बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.


या संपात सहभागी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या गेट समोर कामबंद आंदोलन करत संपात सामील झाले आहेत, गेल्या अनेक दिवस महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी....


(१) जुनी पेन्शन योजना लागू करावी. (२) रद्द केलेली सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी. (३) १०,२०,३० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी. (४) ५८ महिन्यांची सातवा वेतन आयोगाची थकबाकी त्वरित मिळावी. (५) विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती सर्व पदे त्वरित भरण्यात यावी.

अशा अनेक मागण्यांसाठी वारंवार शासनाशी चर्चा करून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही, खोटे आश्वासन देत वेळकाढू धोरण राबविले आहे, म्हणून शासन दरबारी आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाने १६/०५/२०२३ रोजी एकदिवसीय संप पुकारला होता परंतु शासनाने सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक  २०/०२/२०२३ पासून सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे स्वतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांना कार्यालयाच्या गेट चे कुलूप उघडुन कार्यभार सुरू करावा लागला व महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी कामावर नसल्यामुळे प्रशासकीय व शैक्षणिक कामांची पूर्तता करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. 



तसेच संघटनेचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष आर. आर. जोगी यांनी सांगितले की यापूर्वी आम्ही शासनाला अनेकदा निवेदने दिली, एक दिवसाचा लाक्षणिक संप ही पुकारला होता परंतु आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही म्हणून नाईलाजाने संघटनेला बेमुदत संप पुकारवा लागत आहे, परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच प्रशासनाचे नुकसान होत आहे त्यास सर्वस्वी शासन जबाबदार आहे. असे मत महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे, धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर चे स्थानिक शाखेचे अध्यक्ष- आर. आर. जोगी, उपाध्यक्ष- आर. वाय. तायडे, सचिव- पवन अजलसोंडे यांनी सांगितले. 


प्रसंगी आंदोलनाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राचार्य फोरम चे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय प्राध्यापक संघ, विविध कर्मचारी संघांचे अध्यक्ष तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष- एस.के.चौधरी, सचिव- एम. टी. फिरके, नियामक मंडळाचे सदस्य- डॉ. जी.पी. पाटील, उपप्राचार्य- व्ही.सी. बोरोले यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.



आंदोलनात धनाजी नाना महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ चे अध्यक्ष- आर.आर.जोगी, उपाध्यक्ष- अर. वाय. तायडे. तसेच दिगंबर वाघुळदे, ललित पाटील, डी. एस. चव्हाण, गुलाब वाघोदे, मयूर महाजन, राजेंद्र ठाकूर, डी.के.तायडे, एन.व्ही.जोगी, फरीद तडवी, सहर्ष चौधरी, दिलीप मेढे, सुरेखा सोनवणे, प्रमोद अजलसोंडे व  संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते. 


यावेळी सर्वांनी एकत्रित घोषणा देत हमारी मांगे पुरी करो..., शासनाचा धिक्कार असो..., महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचा विजय असो..., कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही... अशा अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم