प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सक्षम संवादिनी सक्षम महाराष्ट्र या महाराष्ट्र राज्य शासन महिला सक्षमीकरण अनेक योजनांची माहिती. अंमलबजावणी शासनाच्या विविध महिला कल्याण कारी योजनेत महिलांनी सहभाग वाढविण्यासाठी संवादिनी हा उपक्रम राबविण्यात येत असतो.
यात प्रामुख्याने माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ बेटी पढाओ, अस्मिता योजना, अमृत आहार योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोगय योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी. महिला उद्योग धोरण, युनिसेफ. महिलांसाठी पुरस्कार अशा अनेक महिलांसाठी योजना, उपयुक्त माहिती. समाजातील विविध घटकांना सांगणे, पोहोचविण्याचे एक प्रभावी सामाजिक कार्य सौ. वैशाली ताठे हे प्रभावीपणे संवादिनी च्या माध्यमातून मोलाचे योगदान देत असतात.
या योजनांची माहिती पुस्तिका अनेक महिला यांना आपल्या हस्ते त्यांनी वाटप करून गावाच्या विकासासाठी पुरुषांबरोबर महिला ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि सक्षमपणे समाज घडू शकतात. असे हे समाजकार्य या सर्व महिलांसाठी संवादिनी च्या कार्यक्रमातून सौ वैशाली ताठे ह्या कार्यासाठी त्यांना त्यांचे पती विलास ताठे सामाजिक कार्यकर्ते यांची खंबीरपणे साथ मिळत असते.
या सामाजिक कार्याची सदर दखल महाराष्ट्र शासनाच्या माहीती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने आयोजित संवादिनी महिलांचा महिलांसाठी जनजागर या अभियानात सौ वैशाली विलास ताठे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुंभारखेडा यांनी संवादिनी उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांना हे सन्मानपत्र देण्यात आले आहे. हा त्यांच्या साठी एक बहुमानच आहे.
यामुळे सौ. वैशाली विलास ताठे ह्यांचे कुंभारखेडा सह परिसरात भरभरून कौतुक होत आहे.
o----------ooo------------o
إرسال تعليق