Khandesh Darpan 24x7

सावदा नगरपरिषद येथे शहिदांना मानवंदना देत शहीद दिवस साजरा....!

प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा तालुका रावेर येथील नगरपरिषद येथे दरवर्षीप्रमाणे आज रोजी शहीद दिन साजरा करून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहून मानवंदना दिली.

याप्रसंगी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील, अंतर्गत लेखापरीक्षक भारती पाटील, सतीश पाटील, विमलेश जैन, हमीद तडवी व शिपाई चंद्रकांत धांडे यांची उपस्थिती होती.
भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. शहीद दिनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली वाहिली जाते. कारण, याच दिवशी त्यांना फाशी देण्यात आली होती. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोर तुरुंगात ब्रिटीश शासकांनी फाशी दिली होती. या दिवशी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांच्या शौर्याचा आणि वचनबद्धतेचा सन्मान केला जातो. 23 मार्च व्यतिरिक्त ज्या दिवशी महात्मा गांधी यांची हत्या झाली, 30 जानेवारी हा दिवस देखील शहीद दिन म्हणूनही साजरा केला जातो. 23 मार्च रोजी साजरा होणारा शहीद दिन हा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांच्या बलिदानाचे स्मरण करून साजरा केला जातो. शहीद दिनानिमित्त भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना जगाच्या इतिहासात भगतसिंगांसारखे अद्वितीय व्यक्तिमत्त्व असावे, ज्यांनी एवढ्या लहान वयात जगाला आदर्श घालून दिला.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم