खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
VISITOR --
रेल्वेने चार दिवसांचा मेगा ब्लॉक केला आहे. हा मेगा ब्लॉक आज पासून ते ३० मार्च पर्यंत राहणार आहे त्यामुळे काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. विविध विकास कामांसाठी हा बदल केला गेला.
पहा काय बदल झाले --
- सोलापूर विभागात हा चार दिवसांचा मेगा ब्लॉक राहणार आहे. तसेच निजामाबाद- पुणे, नांदेड-पुणे, हडपसर-नांदेड, कोल्हापूर-गोंदिया, नागपूर-पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- तर बेंगलोर-न्यू दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडा-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, पुणे-वाराणसी एक्सप्रेस, यशवंतपुर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस चे मार्ग बदलण्यात आले आहे.
काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत - -
- २८ मार्चला – कोल्हापूर-गोंदिया एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड पुणे एक्स्प्रेस.
- २९ मार्चला - पुणे-नांदेड एक्स्प्रेस, पुणे नागपूर एक्स्प्रेस.
- ३० मार्चला - गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
- १ एप्रिलला - निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.
إرسال تعليق