Khandesh Darpan 24x7

सावद्यात "जय राम श्रीराम जय जय राम" गजरात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा शहरातील श्रीराम मंदिरात भगवान राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर तथा परिसर सुंदर मनमोहक असे सुशोभीत करण्यात आले. तसेच श्रीराम मंदिरात हभप मोहन महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करून दु. १२ वा. जन्मोत्सव साजरा करण्यात आला. प्रसंगी अबालवृद्ध भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.




भारत भूमी ही नेहमीच पवित्र भूमी राहिली आहे, इतिहासानुसार येथे अनेक देवी-देवतांनी मानव हितासाठी अवतार घेतला आहे. जेव्हा पृथ्वीवर रावण नामक असुराचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आणि साधारण मानव ऋषि त्रस्त झाले, तेव्हा पुन्हा या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी भारत भूमीवर महापुरुषाचा जन्म झाला. या महापुरुषाचे नाव भगवान राम होते. ज्यांनी रावणाच्या अत्याचारातून मुक्ती मिळवली आणि मानव जातीचे रक्षण केले. 


सावदा येथे श्रीराम मंदिरात भगवान राम यांचा जन्मदिवस राम नवमी म्हणून मोठ्या जल्लोषात तसेच अगदी पारंपरिक पद्धतीने शहरात पालखी द्वारे भव्य अशी मिरवणूक काढून साजरा केला गेला. यावेळी "जय राम श्रीराम जय जय राम" या गगनभेदी गर्जनांने परिसरात आनंदीमय वातावरण तयार झाले. 



संभाजी चौक तसेच प्रत्येक चौका चौकात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या तैंल प्रतिमेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन देखील करण्यात आले. 


सदरील मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने जे. के. भारंबे, डॉ. चंद्रशेखर पाटील, अड. कालीदास ठाकूर, विक्कीभिडे, निलेश खाचणे, सुरज परदेशी, मनिष भंगाळे सह माजी नगरसेवक, नगरसेविका, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांसह महिला व लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. 



याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिस ठाण्यास लाभलेले कर्तव्यदक्ष ए. पी. आय.  जलींदर पळे यांनी जातीने लक्ष घालून, त्यांचे सहकारी ए. एस. आय. मेहमूद शाहा, पी. एस. आय.  अनवर तडवी, पोलीस हेड कॉ. उमेश पाटील, गोपनीय विभागाचे पो. नाईक यशवंत टाहकडे, देवेंद्र पाटील व गृहरक्षक दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक यांनी शहरात जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم