खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
होळी हा सण का साजरा केला जातो ?
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा.
स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते.
तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही.
राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.
भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन
महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस
साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग
उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
होळी च्या दिवशी काय करावे?
1. होळीच्या दिवशी सेंद्रिय आणि नैसर्गिक रंग वापरा.
जसे की फूड डाय.
2. या दिवशी तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांनी तुमचे
संपूर्ण शरीर झाकले पाहिजे जेणेकरुन जेव्हा कोणी तुम्हाला रसायनांनी बनवलेले रंग
लावते तेव्हा कपड्यांमुळे तुमची त्वचा वाचते.
3. तुमच्या चेहऱ्यावर, शरीरावर आणि केसांना कोणतेही तेल लावा
जेणेकरून तुम्ही अंघोळ करताना रंग काढून टाकण्याचा प्रयत्न कराल तेव्हा ते सहज
काढता येतील.
4. रंग खेळल्यानंतर तुम्हाला काही शारीरिक त्रास होऊ
लागल्यास, तुमच्या
जवळच्या रुग्णालयात त्वरित उपचार करा.
5. दम्याच्या रुग्णांनी रंग खेळताना फेस मास्क
वापरणे आवश्यक आहे.
6. केस खराब होऊ नयेत म्हणून तुम्ही डोक्यावर टोपी
वापरू शकता.
होळीच्या
दिवशी काय करू नये?
1. केमिकल किंवा सिंथेटिक रंगांपासून बनवलेले रंग
अजिबात वापरू नका.
2. कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात, नाकात, तोंडात आणि कानात
रंग जाऊ देऊ नका.
3. होळीचा दिवस आपल्या कुटुंब आणि मित्रांसह एकत्र
साजरा करा आणि अनोळखी लोकांपासून दूर रहा.
4. एक्जिमा ग्रस्त लोक रंगांपासून दूर राहण्याचा
प्रयत्न करतात.
5. कोणावरही रंगांची सक्ती करू नका किंवा ते
प्राण्यांवर लावू नका, जसे हे
रंग आपल्यासाठी धोकादायक आहेत, त्याचप्रमाणे ते प्राण्यांसाठीही तितकेच धोकादायक
आहेत.
6. स्वस्त चायनीज रंगांपासून दूर राहा कारण ते
त्वचेसाठी खूप हानिकारक असतात.
إرسال تعليق