Khandesh Darpan 24x7

निती आयोग संलग्नित संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार लेवाजगत संपादक शाम पाटील यांना जाहीर...!

प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे समाजसेवक, प्रवचनकार प्रबोधनकार, अपंगसेवक ह्यांनी येथे व्यक्त केले. ह्या कार्यक्रमासाठी खासदार उन्मेषदादा भैयासाहेब पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तर आमदार सुरेश तथा राजुमामा भोळे, डॉ संजय कोलते आय ए एस प्रमुख कार्यकारी संचालक स्मार्ट सिटी पुणे, अनुव्रतश्री डॉ ललीता जोगड साहित्यिक मुबई, संजय देशमुख अध्यक्ष अभा लोकस्वातंत्र पत्रकारमहासंघ अकोला,निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पिपंरी चींचवड लेवा पाटीदार संघ, सचिव नीतिन बारसू बोंडे, डी. के.देशमुख भ्रातृमंडल बुलडाणा, डॉ अशोक के पाटील उपाध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे ह्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 



ह्या वर्षीच्या डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यामध्ये, सावदा येथील श्याम वसंत पाटील, पत्रकारिता संपादक लेवाजगत सावदा, जळगाव, यांची निवड करण्अयात आलेली आहे. डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार निती आयोग संलग्नित भारत सरकार राष्ट्र सेवा समिती महाराष्ट्र राज्य वतीने जाहीर करण्यात आले असून स्मृती चिन्हं सन्मानपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमात स्व गिरीष बापट खासदार ह्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. हा कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ येरवडा पुणे येथे दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ८ च्या दरम्यान होईल असेही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार, प्रबोधनकार, डॉ रविंद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान ह्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم