प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि. २४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता पवित्र रमजान ईद निमित्त दोघं समाजात स्नेह-बंद कायम नांदवावे याकरिता पत्रकार शेख फरीद शेख नुरोद्दीन व युसूफ शाह सुपडू शाह आणि इरफान मिया यांनी ईद निमित्त शिरखुर्म्याच्या कार्यक्रमाचे प्रयोजन केले होते.
या कार्यक्रमा मागील मुख्य उद्देश असा की, सतत दोघं समाजामध्ये स्नहे-बंदू भाव कायम टीकून राहवा या करिता निमित्त कोणतेही असो, परंतु जे चांगले कार्य व कार्यक्रमांमुळे दोघं समाजातील दरी कमी होण्यास मदत होईल असे छोटेखानी का होईना, कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे ठरते.
वरील कार्यक्रमात....
रावेर तालुक्यास सुपरिचित व नव्याने लाभलेले तहसीलदार बंडू कापसे, सावदा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहा. पोलीस निरीक्षक जालींदर पळे, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहाले.
जेष्ठ पत्रकार श्याम पाटील, रावेर तालुका ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रदिप महाराज पंजाबी (खिर्डी), पिंटू कुलकर्णी, दिलीप चांदेलकर, राजू दिपके, प्रदिप कुळकर्णी, राजेश चौधरी (राज सर), कैलास लंवगळे.
सह समाजसेवक गजू ठोसरे, शिवसेनेचे सुरज परदेशी, गोपनीय विभागाची पोलीस यशवंत टाहाकळे, देवेंद्र पाटील, किरण पाटील, विकास जोशी, होमगार्ड निलेश खाचणे, तलाठी कार्यालयातील सुरेश बोरनारे सह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق