प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
जवळपास ४० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले सावदा येथील ज्येष्ठ पत्रकार व लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक श्याम वसंत पाटील यांनी सतत आपल्या निर्भीड व धारदार लेखणीतून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी, तसेच पत्रकारितेतून समाजाची समरसता टिकवून ठेवण्यासाठी मोलाची भुमिका घेवून सर्व समावेशक विचाराच्या आधारावर त्यांनी सावदा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून देखील आले होते.
त्यांना समाजिक, शैक्षणिक, राजकीय, भौगोलिक, कृषी, क्रीडा, धार्मिक सह विविध क्षेत्राचा दांडगा अनुभव असून, ते ताप्ती सातपुडा जर्नलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून ते विविध उत्कृष्ट व समाज उपयोगी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम आयोजित करतात.
तसेच १) अन्नधान्य पीकवेल शेतकरी तर देशात नांदेल सुख - समृद्धी २) मास्क हेच राष्ट्रीय कर्तव्य ३) तात्कालीन मुख्यमंत्र्यांची छायाचित्र सह माझी कुटुंब माझी जबाबदारी असे स्लोगन सोबत मुलगा पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी असे सामाजिक संदेश त्यांनी "स्वतःच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत छापून जनजागृती करून सर्वांचे लक्ष वेधण्याचे कार्य त्यावेळी केलेले आहे.
तरी अशा कार्यामुळे बहुचर्चित असलेले श्याम वसंत पाटील यांच्या सदरील कार्याची दखल घेऊन त्यांचे नाव राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आल्याने, त्यांना पुणे येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज याठिकाणी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत दि. २७ एप्रिल २०२३ रोजी मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने "पद्मश्री डॉ. मणीभाई राष्ट्रीय सेवा" या पुरस्काराने गौरविण्यात आल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
إرسال تعليق