प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
कृषी विज्ञान केंद्र पाल व आनंद कृषी विद्यापीठ, आनंद (विस्तार शिक्षण संस्था, आनंद) गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ मे ते २४ मे २०२३ दरम्यान ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट स्किल फॉर प्रोफेशनल एक्सलन्स या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली.
जळगाव जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कृषी विस्तार अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी अजित दादा पाटील (सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल) हे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र व सातपुडा विकास मंडळ विषयी उपस्थित सर्व कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. महेश महाजन यांनी कार्यक्रम संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी प्रास्ताविक सादर केले.
या प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान डॉ. रवी कुमार चौधरी प्रशिक्षण समन्वय (प्रशिक्षण संचालक) व डॉ. योगेश राधवा (प्रशिक्षण समन्वयक) म्हणून कार्यक्रमाचे काम पाहणार आहेत. त्याचप्रमाणे मनुष्यबळ विकसित करण्यासाठीचे कौशल्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी (कृषी विभाग, जळगाव) व कृषी विस्तार अधिकारी (जिल्हा परिषद, जळगाव) या कार्यालयातील एकूण २५ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धीरज नेहेते व आभार अतुल पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
إرسال تعليق