खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा --
मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानात आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा बिलिंग काऊंटरवर (Billing Counter) आपला मोबाईल नंबर (Mobile Number) विचारला जातो. काहीही न विचारता आपणही तो सहजपणे देऊन टाकतो. मात्र आता बिल देण्यापूर्वी कोणत्याही दुकानदाराला मोबाईल नंबर देण्याची गरज भासणार नाही. ही पद्धत बंद करण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयानं (Consumer Affairs Ministry) सूचना जारी केल्यात. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह (Rohit Kumar Singh) यांनी याविषयी माहिती दिली आहे.
तुमचा मोबाईल नंबर देऊ नका
यापुढे कोणताही विक्रेता ग्राहकाच्या मोबाईल नंबरसाठी आग्रह धरू शकत नाही. दुकानदारानं मोबाईल नंबर मागणं हा प्रकार 'अयोग्य व्यापार प्रथा' नियमाअंतर्गत येतो. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार (Consumer Protection Act) अन्यायकारक आणि प्रतिबंधात्मक व्यवहार पद्धत आहे. ग्राहकाचा मोबाईल नंबर हा गोपनीयतेचा मुद्दा आहे. दुकानदाराला मोबाईल नंबर न देण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. दुकानदार किंवा मॉलकडून मोबाईल नंबर मागण्याची सक्ती झाल्यास ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करता येणार आहे.
शॉपिंग मॉल, रिटेल स्टोरमध्ये खरेदी केल्यानंतर बिल काऊंटरवर ग्राहकाचा मोबाईल नंबर मागितला जातो. कॉम्प्यूटरमध्ये ग्राहकाचा मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर बिलिंगची प्रक्रिया पुढे जाते. अनेक ठिकाणी तर मोबाईल नंबरबरोबरच ईमेल आयडी देखील मागितला जातो. पण आता मोबाईल नंबर देणं बंधनकारक नाही. ग्राहकांची संमती असेल तरच तो दुकानदाराशी आपला मोबाईल नंबर शेअर करु शकतो. यासाठी दुकानदार ग्राहकावर दबाव टाकू शकत नाही.
मोबाईल नंबरशिवाय बिल तयार करु शकत नाही, असं दुकानदारांकडून सांगितलं जातं आणि जबरदस्तीनं ग्राहकांचा मोबाईल नंबर मागितला जातो. बिल देण्यापूर्वी प्रत्येक वेळी मोबाईल क्रमांक विचारण्याच्या पद्धतीवर सातत्याने लोकांकडून तक्रारी नोंदवल्या जात होत्या. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.. त्यामुळे यापुढे दुकानदारानं किंवा मॉलमध्ये तुमचा मोबाईल नंबर मागितला गेला तर अजिबात देऊ नका..
क्यू आर कोड वापरताना सावधान
देशात क्यूआर कोडद्वारे पेमेंट करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. यूपीआयवर आधारित पैसे देण्याची ही पद्धत लोकप्रिय ठरलीय. त्यामुळे हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होतेय. बनावट क्यूआर कोड लावून लोकांचे स्मार्टफोन हॅक करण्याचं प्रमाण वाढलंय. एवढंच नाही तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा वापर करुन ब्लॅकमेल देखील केलं जातं.
إرسال تعليق