प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
Reserve Bank of India तर्फे जळगाव येथे All India quiz on financial literacy या विषयावर प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये सावदा नगर परिषद संचालित श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, सावदा येथील कु. कोमल नीलकंठ भंगाळे व कु. प्राची दत्तात्रय बऱ्हाटे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक श्री. प्रकाश भालेराव, उपशिक्षिका सौ. निर्मला बेंडाळे तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेत यश मिळाल्याबद्दल सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सदरील विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
WAA याला म्हणतात बातमी
ردحذفयाला म्हणतात न्युज पोर्टल
याला म्हणतात बातमी ची मांडणी....
إرسال تعليق