प्रतिनिधी : युवराज चौधरी | राजेश चौधरी
बहुतांश थोर लेवेपाटीदार समाज बांधवांचे जन्मस्थान रावेर तालुक्यातील चुनवाडे गाव. परिवारातील ज्येष्ठ वडीलधारी, माता-भगिनी मंडळी यांच्या इच्छेला, शब्दाला मान देऊन चुनवाडेकर चौधरी परिवारा चे श्रद्धास्थान मुंजोबा आणि आसरा देवतां मंदिराचा जिणोध्दार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कुलाचार श्रद्धा भक्ती ठेवत चूनवाडे येथील चौधरी कुटुंबांचे मुंजोंबा आणि आसरा या दोन मंदीरांचा जिणोध्दार कार्यक्रम दिनांक १०/०६/२०२३ आणि ११/०६/२०२३ कार्यक्रम संपन्न झाला. गावातील सर्व मंदिरांना सुचीर्भूत करून शेंदूर, गुलाल, दिप धूपबत्ती देण्यात आली.
परंपरेनुसार दरवर्षी आरत्या लावण्यासाठी परिवारातील सदस्य मनोभावे या आपल्या जन्मगाव चुनवाडे येथे एकत्र येतात व रितीरिवाजा प्रमाणे आपली श्रद्धा पूर्ण करतात, आशीर्वाद घेऊन धन्य होतात. परिवारातील सदस्य यांच्या मनात श्रद्धा, भक्तीची बाग फुलवण्यासाठी हा संस्कार कार्यक्रम उपयुक्त ठरला. कार्यक्रम यशस्वीते साठी विश्वनाथ एकनाथ चौधरी, वासुदेव पंढरीनाथ चौधरी, विजय पंढरीनाथ चौधरी, सुधीर जगन्नाथ चौधरी, हरिश्चंद्र एकनाथ चौधरी, गिरीश सुरेश चौधरी, कमलाकर एकनाथ चौधरी, सुनील गंगाधर चौधरी, अरविंद जनार्दन चौधरी, विनायक जनार्दन चौधरी, नथ्थू वना चौधरी, प्रवीण मुरलीधर चौधरी, सतिश भागवत चौधरी, सौ. अलका विश्वनाथ चौधरी, सौ. कविता विजय चौधरी, सौ. अनिता टीनुराज चौधरी, सौ. शितल सुनिल चौधरी यांनी आणि परिवारातील माता भगिनी सर्व चुनवाडेकर ग्रामस्थ यांनी कार्यक्रम संपन्न होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
धार्मिक कुलाचार पूर्ण करण्यासाठी गोत्र परिवारातील सर्व सदस्य बांधव, माता भगिनी, बालगोपाल उपस्थित होते. निसर्गरम्य वातावरणात प्रसाद, स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला. सर्वत्र या कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.
إرسال تعليق