प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा तालुका रावेर येथील मोठा आखाडा धर्मशाळेची इमारत ही शादी हॉल साठी मिळावी यासाठी आज नगरपरिषद सावदा येथील प्रशासकीय अधिकारी सचिन चोळके यांना अक्रम खान बाल खान यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेकडील मोठा आखाडा येथील धर्मशाळा या नावाने असलेली इमारत मुस्लिम समाजासाठी शादी हॉल साठी मिळावे सदर शादी हॉल ही सामाजिक व सांस्कृतिक कामासाठी आवश्यक असल्याने ती आम्हाला देण्यात यावी तसेच आमच्या मागणीवर विचार करून येथे शादी हॉल तयार करून मिळावा.
सदर निवेदनावर साबीर अकबर मण्यार, युनुस खान युसूफ खान, शेख मेहताब, परवेज खान फिरोज खान, गुलाम अशरफ, हाजी अख्तर, मेहताब शेख, अक्रम खान, सय्यद याकूब, आलीयार खान, समोद्दीन, शब्बीर टायरवाले, परवेज खान, युनूस खान, शेख इरफान यांच्या सह्या आहेत.
निवेदन देतेवेळी नगरपालिका येथे सुमारे ५० ते ६० मुस्लिम बांधव उपस्थित होते.
إرسال تعليق