प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत "मुख्यमंत्री सहाय्यता निधी" या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली याचे व्यवस्थापन केले जाते. मा. मुख्यमंत्री, या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात.
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी" मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता सावदा नगरपरिषदेच्या कर्मचारी यांच्याकडून मदतकार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य आणि मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून सावदा नगरपरिषद मधील शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यबुध्दीने त्यांनी माहे जून, २०२३ च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी १ दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत मदत देणाऱ्या कर्मचारी यांची नावे खालीलप्रमाणे --
१) श्री. किशोर चव्हाण (मुख्याधिकारी)
२) श्री. सचिन चोळके (कार्यालय अधिक्षक)
३) श्री. विशाल पाटील (लेखापाल)
४) श्रीमती भारती पाटील (अंतर्गत लेखापरीक्षक)
५) श्री. अविनाश गवळे (स्थापत्य अभियंता)
६) श्री. अनिलकुमार आहुजा (कर निरीक्षक)
७) श्री. सतीश पाटील (वरिष्ठ लिपिक)
८) श्री. बबन तडवी (लिपिक)
९) श्री. मनोज चौधरी (लिपिक)
१०) श्री. अरुण ठोसरे (लिपिक)
११) श्री. हमीद तडवी (लिपिक)
१२) श्री. संजय माळी (लिपिक)
१३) सौ. लता भंगाळे
إرسال تعليق