प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
आज दिनांक २१/७/२०२३ रोजी बँक ऑफ बडोदा, सावदा शाखे तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
बँक ऑफ बडोदा चा ११६ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सावदा येथील श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यालयात गरीब, हुशार, होतकरू असलेल्या सुमारे ५० विद्यार्थिनी ना शालेय वस्तू बँकेचे असिस्टंट मॅनेजर प्रशांत शिंदे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. त्यांचे समवेत त्यांचे सहकारी सचिन पाटील हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनीना बँक मार्फत मदत होत असल्याने खूप आनंद झाला. अशीच मदत यापुढेही बँक मार्फत करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक पी. जी. भालेराव, संजय भोई, राधारानी टोके, मोहिनी राणे, निर्मला बेंडाळे, स्वप्नील वंजारी, सचिन सकळकळे आदी उपस्थित होते.
إرسال تعليق