Khandesh Darpan 24x7

सावद्यात कब्रस्तानासाठी आ.चंद्रकांत पाटील यांना मुस्लिम बांधवांचे निवेदन...


प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 

रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गेल्या १० वर्षांपासून बखळ पडलेली सुन्नी मुस्लिम कब्रस्तानाची नियोजित जागेचे कंपाउंड वॉल सह या जागेवर रस्ते, कुपनलिका, लाईट व जनाजा नमाजपठणसाठी शेड उभारून मिळावे. अशी मागणी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे दि. १६ जुलै २०२३ रोजी शहरातील समाजसेवक सोहेल खान सैदुल्ला खान, फरीद शेख,युसूफ शाह यांचे नेतृत्वखाली मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली असता क्षणाचाही विलंब न लावता उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांच्या समक्ष 



आ. चंद्रकांत पाटील यांनी सदरील सुविधा माझ्या स्तरावर लवकरात लवकर पुर्ण करून देण्यास मी बांधील  आहे. पंधरा दिवसाचे अधिवेशन संपल्यानंतर कब्रस्तानाच्या तार वॉल कंपाऊंडच्या कामाची सुरुवात केली जाईल, तसेच यानंतर कब्रस्तानाच्या जागेवर उर्वरित सुविधा देखील जलदगतीने मार्गी लावण्यात येईल. असे एक वचनी शब्द त्यांनी यावेळी दिले आहे.तरी आपली मागणी अनुसार सुविधांची पुर्ती होवून मिळणारच असे स्वतःच्या डोळ्यांने पाहून व कानाने ऐकतच उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. 



याप्रसंगी हाजी कादीर खान,कलीम जनाब,माजी मुख्याध्यापक अय्युख खान, सैय्यद अकील,शेख नईम, शेख निसार अहमद,शेख कमरूद्दीन,मोईन खान,मुश्ताक भाई,शेख मुख्तार,फिरोज खान,अनिस इब्राहिम, शेख साजीद उर्फ मडा,बब्लू टेलर,अल्ला रख्खा,शेख आबीद,गुलाम नबी,रज़ा शाह,शेख जुबेर,खालील भाई,अरमान शाह, इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.


यापुर्वी निधी आणि विकास हे शब्द फक्त ऐकण्यास मिळत होते. परंतु "प्राण जाये पर वचन न जाये" या ब्रीद वाक्याला अनुसरून संपूर्ण मतदारसंघात मंजूर निधी सह विकास कामांची गंगा भाऊ चंद्रकांत पाटील आमदार झाल्यापासून वाहताना दिसू लागली.विषेशकर आ.पाटील यांची कार्यप्रणालीचा केंद्र बिंदू हा सर्वसमावेशक आहे.असे आमदारांच्या कार्यलय जवळ कामानिमित्त आलेले मतदारसंघातील लोकांकडून बोलले जात होते. हे मात्र खरे आहे.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم