Khandesh Darpan 24x7

भामलवाडी येथील पत्रकार "विनोद कोळी" यांचेवरील जीवघेणा हल्ल्याचा निषेध - पत्रकार संरक्षण समिती रावेर



जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे तक्रार करणार


 प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 



भामलवाडी, तालुका रावेर येथील पत्रकार विनोद कोळी हे बातमी वृत्त संकलनासाठी चित्रीकरण करत असताना येथीलच काही उपद्रवींनी पत्रकार विनोद कोळी आणि त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले यांना मारहाण केली व त्यांच्यावर जीव घेणा हल्ला करून त्यांना दुखापत केली.


याविषयी संबंधित पोलीस अधिकारी यांनी कोणतीही तक्रार न घेता उलट त्यांना "तुम्ही पत्रकार आहात याचा पुरावा द्या" आणि पुरावा दिल्यानंतर "तुम्ही पत्रकार आहात पण आधी स्वीकृती पत्रकात आहात का? तरच मी तुमची तक्रार घेईल" अशा स्वरूपामध्ये त्यांची व मारहाण करणाऱ्यांची बाजू सांभाळली.



याविषयी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती शहरी व ग्रामीण दोन्ही समित्या मिळून सावदा येथील विश्रामगृहावर दिनांक १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.



याप्रसंगी ग्रामीण आणि शहरी दोघे मिळून मोठ्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती होती. पत्रकारांवर वारंवार होत असलेले भ्याड हल्ले त्वरित थांबवावे व भ्याड आलेख करणाऱ्यांना त्वरित शासन व्हावे यासाठी पत्रकार बांधव आता शांत राहणार नाहीत व संबंधितांना शासन झालेच पाहिजे यासाठी संबंधित अधिकाऱ्याने याबाबत ठोस पाऊल उचलले नाही तर  येत्या सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून याबाबत निवेदन देऊन तक्रार करणार आहे.


यावेळी रावेर तालुका पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष राजू उर्फ मुबारक तडवी, ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रदीप जी महाराज, ज्येष्ठ पत्रकार राजूभाऊ बोरसे, तसेच सर्व पदाधिकारी पत्रकार - युसुफ शाह, फरीद शेख, राजेश (राजू) पाटील, दिलीप चांदेलकर, भीमराव कोचुरे, राजेंद्र महाले, राजेश चौधरी (राज सर), विनोद कोळी, अनिल इंगळे, संजय पाटील, योगेंद्र भालेराव, मोहसीन शाह इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم