प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
कर्नाटक राज्य बेळगाव जिल्ह्यात चीकोडी तालुक्यात नंदी पर्वत, जैन तीर्थावरती स्थित असलेले जैन मुनीश्री आचार्य प.पू. श्री १०८ कामकुमार नंदीजी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा सावदा दिगंबर जैन समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जैन संत अहिंसेचे अनुयायी असून निस्वार्थपणे आपले जीवन समाजाच्या कल्याणाकरिता आणि धर्माचा प्रचार व प्रसार करण्याकरिता अविरतपणे घालावीत असतात. वास्तव हे असे कि जैन समाज हा अहिंसावादी असून जैन संत हे भगवान आदिनाथ ते भगवान महावीर या २४ तीर्थांकराचे उपदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे धर्मकार्य असताना इतक्या क्रूरपणे हत्या होणे यापेक्षा लाजिरवाणी व दुर्दैवी घटना असू शकत नाही.
संपूर्ण भारतातील अहिंसावादी जैन समाजामध्ये सादर घटनेमुळे शोककळा पसरली असून संताप व्यक्त होत आहे. तसेच यामुळे जैन साधुसंतांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे. तरी आचार्य प.पू. श्री १०८ कामकुमार नंदीजी महाराजयांची निर्दयी व क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर हून कठोर देण्यात यावी अशी मागणी आज प्रत्येक जनमानसात निर्माण होत आहे. जेणे करून यापुढे अश्या क्रूर प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसेल. त्याचप्रमाणे जैन साधुसंताना योग्य ती सुरक्षा पुरविण्याबाबत सुद्धा योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी जैन समाजाने केली आहे.
إرسال تعليق