Khandesh Darpan 24x7

पाकिस्तानात हिंदूंच्या मंदिरावर झालेल्या हल्लेच्या निषेधार्थ सावद्यातील मुस्लिम बांधवांनी प्रांत अधिकाऱ्यास दिले निवेदन !



 प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


नुकतेच पाकिस्तान येथील कराची सह कश्मीर गावात हिंदू बांधवांचे पवित्र प्रार्थना  स्थानांवर हल्ले करून तोडफोड केल्याची घटना सह येथील रहिवासी हिंदू बांधवांच्या घरांवर पाकिस्तानी समाजकंट व अधर्मीवृत्तीच्या निर्लज्जांकडून करण्यात आलेली अंदाधुंद गोळीबारीला फक्त आणि फक्त पाकिस्तान सरकारच जबाबदार असून, या घटनेचा निषेध केला तेवढा कमीच आहे.



तसेच अशा अतिशय चुकीच्या आणि थेट मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यास संपूर्णपणे अपयशी ठरलेली पाकिस्तानी सरकारचा रावेर तालुक्यातील सावदा येथील भारतीय मुस्लिम बांधवांनी आज दि. १७ जुलै २०२३ रोजी थेट उपविभागीय अधिकारी कैलास कडलग फैजपूर भाग फैजपूर यांना झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनास निवेदन देवून पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देऊन पाकिस्तानी सरकार सह येथील अत्याचाऱ्यांचा धिक्कार करून तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला. 



याप्रसंगी समाजसेवक सोहेल खान,फरीद शेख, युसुफ शाह,शेख निसार अहमद, रशीद बागवान, आय्युब सर, साजीद शेख उर्फ मडा, कलीम जनाब, शेख कमरुद्दिन, शौकत खान उर्फ मुल्ला, शेख अनिस इब्राहिम, शेख आबिद, इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم