सावदा ता. रावेर येथील नगरपालिकेच्या वतीने व श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील जुनियर कॉलेज सावदा त्याचप्रमाणे नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा यांच्या संयुक्त विद्यमाने सावदा शहरांमध्ये भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या मशाल रॅलीमध्ये एन.सी.सी. व तिन्ही विद्यालयाची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
सावदा येथील श्री. आ.गं. हायस्कूल सावदा येथून ए.पी.आय. जालिंदर पळे तसेच सावदा नगर पालीकेच्या लेखापरीक्षक भारती पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून भव्य मशाल रॅलीची सुरुवात केली. त्यानंतर ही रॅली विठ्ठल मंदिर, गवत बाजार, शिवाजी चौक, मोठा आड परिसर ते बस स्टॉप वरील बनाना सिटी या शिल्पाला वळसा घालून शहीद अब्दुल हमीद चौकातून नगरपालिका सावदा च्या प्रांगणामध्ये येऊन पोहोचली.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
या ठिकाणी स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोह निमित्त ७५ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या तळ हातावर ७५ दिवे घेऊन त्या दिव्यांच्या व मशालीच्या उजेडामध्ये अतिशय भारावलेल्या वातावरणात सर्वांनी पंचप्राण प्रतिज्ञा घेऊन या सोहळ्याची सांगता केली.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
या प्रसंगी ए.पी.आय जालिंदर पळे, श्री आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील जुनियर कॉलेज चे मुख्याध्यापक सी. सी. सपकाळे, नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा च्या मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे, पर्यवेक्षक जे. वी. तायडे, पी. जी. भालेराव, एन.सी.सी. ऑफिसर संजय महाजन त्याचप्रमाणे नंदू पाटील सर, बी. ए. तेली सर, मनोज महाजन सर, आर. एन. जावळे सर, कल्पना शिरसाठ मॅडम, भारती महाजन मॅडम, प्रणाली काटे मॅडम, सुनिल महाजन सर, संध्या मॅडम, उदय कोळी सर, अतुल सपकाळे, श्रेयश जैन, अमित बेंडाळे, ए. सी. राठोड सर, सचिन सकळकळे सर, दिलीप काळे, बामणोदकर तसेच
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील, लेखापरीक्षक भारती पाटील, बांधकाम विभागाचे गवळे साहेब, करनिरीक्षक चेतन पाटील, सतीश पाटील, आकाश तायडे, संदीप पाटील, व सर्व नगरपालिका कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी व सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस मित्र व इतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ वर क्लिक करा.
कार्यक्रम नगर पालिकेचा परंतु कार्यक्रमा साठी हातावर मोजण्या इतकेच कर्मचारी हजर काही कर्मचारी मात्र कार्यक्रमा पासून वंचित...
إرسال تعليق