सावदा येथील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनय भंग करण्यात आला असून शाळेच्या संचालकांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सावदा शहरातील आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनीला ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शाळेचे संचालक अक्रम खान अमानुल्ला खान याने ऑफिसमध्ये कपड्याचे (नकाब) माप घेण्याचे कारण दाखवून बोलावले व त्या विद्यार्थिनीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.
झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने आपले वर्गशिक्षक फिरोज सर व अरशद सर यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता या तिघांनी विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाच्या कार्यालयात नेऊन "कुणालाही सांगू नको" असे सांगितले.
यामुळे बालिका प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत दोन-तीन दिवस शाळेत गेली नाही यावरून तिच्या आईने विचारणा केली असता विद्यार्थिनींनी तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला असता विद्यार्थिनीच्या पालकांनी दि. ७ रोजी दुपारी तीन वाजता सावदा पोलीस स्थानकात धाव घेतली.
घडलेल्या प्रकरणी सदर शाळेचे संचालक अक्रम खान अमानुल्ला खान राहणार- रजा नगर, सावदा यांच्यासह इरफान खान जमशेद खान राहणार- रजा नगर- सावदा, शेख फिरोज पूर्ण नाव माहित नाही तसेच शेख अरशद पूर्ण नाव माहित नाही या चौघांच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४-ए (१) (आय), १४ तसेच पोक्सो कायद्यामधील कलम ८ आणि १७ अन्वये सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सावदा व परिसरात एकच खळबळ उडाली असून याचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे.
إرسال تعليق