प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर. येथे क्रीडा विभागा तर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अनिल भंगाळे सर व प्रमुख उपस्थितीत जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डाॅ. उदय जगताप सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी सर, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डाॅ. जगदीश खरात सर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे, प्रा. शिवाजी मगर सर, प्रा. दिलीप बोदडे सर ईत्यादी उपस्थितीत होते.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डाॅ. उदय यांनी मांडले, तर सूत्रसंचालन क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख प्रा. गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी केले व अभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.
क्रार्यक्रमाची सुरूवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करतांना प्राचार्य डाॅ. अनिल भंगाळे सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना खेळाचे महत्त्व तसेच आधुनीक युगात खेळाची उपयोगिता आणि शासकीय नोकरीत असलेले आरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले व पुढील काळासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उदय जगताप सर यांनी प्रास्ताविक करतांना २९ ऑगस्ट या तारखेलाच का साजरा करण्यात येतो या विषयावर मार्गदर्शन केले, तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व खेळाडू मित्र व आर. डी. ठाकूर आणि प्रा. गोविंद मारतळे यांनी परिश्रम घेतले.
إرسال تعليق