Khandesh Darpan 24x7

प.पू. लालजी महाराज १०८ श्री सौरभप्रसादजी यांचे श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे आगमन व भव्य स्वागत



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


दिनांक १९ ऑगस्ट 2023 रोज शनिवार या दिवशी श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथे परिसरातील सर्व हरी भक्तांच्या उपस्थितीमध्ये लालजी महाराज 108 श्री सौरभप्रसादजी महाराज यांचे आगमन झाले. त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. 

 



परमपूज्य श्री सौरभप्रसादजी महाराज हे वडतालपिठाधिपती प.पू.धर्मधुरंधर आचार्य श्री 1008 श्री राकेश प्रसाद जी महाराज यांचे सुपुत्र आहेत. 



पूज्य लालजी महाराजांनी राधाकृष्ण देव हरीकृष्ण महाराज यांची आरती करून समस्त हरिभक्तांना दर्शन दिले. तदनंतर सभागृहामध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमध्ये सुरत मंदिरचे कोठारी प.पू.स.गू. शास्त्री स्वामी पुरुषोत्तमप्रकाशदासजी, त्याचप्रमाणे सावदा मंदिर चे कोठारी शास्त्री स्वामी भक्तीकिशोरदासजी यांची प्रमुख उपस्थिती होती.


त्याचप्रमाणे लालजी महाराज यांच्या सोबत आलेले संतगण शास्त्री स्वामी  गुणसागरदासजी, शास्त्री स्वामी अनंत प्रकाशदासजी,  स्वामी  माधवप्रसाददासजी,  स्वामी लक्ष्मीनारायणदासजी, स्वामी  सत्यप्रकाश दासजी हे सुद्धा सभेमध्ये उपस्थित होते.


सदर सभेमध्ये शास्त्री स्वामी पुरुषोत्तमप्रकाशदासजी यांनी, श्री स्वामिनारायण मंदिर सावदा येथील मूर्तींचा दिव्य इतिहास लालजी महाराज श्री सौरभप्रसादजी यांच्यासमोर विशद केला. तदनंतर  शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासजी यांनी खानदेशची महती लालजी महाराज श्री सौरभ प्रसाद दास जी यांच्यासमोर विशद केले.


तदनंतर परमपूज्य आचार्य 108 श्री लालजी  महाराज यांनी सर्व हरिभक्तांना उपदेश करताना, श्री स्वामिनारायण भगवान यांनी शिक्षापत्रित केलेला उपदेशाचे सर्वांना स्मरण करून दिले व श्रीजी महाराजांनी ठरवून दिलेली आचारसंहिता, शिक्षापत्रीनुसार असलेले नियम यानुसार सर्व हरी भक्तांनी श्रीजी महाराजांचे आश्रित राहून आपल्या धर्माचे पालन करावे. त्याचप्रमाणे सर्व संतांचा आदेश हा शिरसावंद मानून त्यानुसार आपण आपले आचरण ठेवावे. असा उपदेश सर्व हरिभक्तांना देऊन आशीर्वाद दिलेत.



या नंतर उपस्थित सर्व विश्वस्त व उपस्थितांनी पुष्पमाळांनी परमपूज्य श्री सौरभप्रसादजी महाराज यांचे स्वागत व सन्मान केला. याप्रसंगी सावदा शहरातील सर्व प्रतिष्ठित हरिभक्त पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم