शिवा संघटनेने दूरदृष्टी ठेऊन वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची सर्वप्रथम मागणी केली व अनेक वर्षांपासून प्रयत्न पाठपुरावा केला. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची शासनाकडून मंजुरीमुळे शिवा संघटनेच्या पाठपुराव्यास यश मिळाल्याचे संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांनी सांगितले
महामंडळासाठी सर्वप्रथम अनेक वर्षांपासून यशस्वी मागणी, प्रयत्न पाठपुरावा करणारे शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्र राज्य शासना यांनी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र वीरशैव मोक्षधाम योजना, महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती, कपिलधार तिर्थक्षेत्र दर्जा, शासकीय महापूजा, परिसराच्या विकासासाठी आर्थिक तरतूद, महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार यासह अनेक समाजहिताची यशस्वी कार्य केली आहेत. आता लवकरच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. त्याचा वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी लाभ घेऊन स्वतंत्र उद्योग व्यवसायात उंच भरारी घ्यावी, असे आवाहन सावदा येथील शिवा संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष कैलास लवंगडे यांनी सांगितले आहे.
إرسال تعليق