प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा- येथील पालिका संचलित नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर, श्री.आ. गं. हायस्कूल व ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयात शहरातील कर्मयोगी सतत ३४ वर्ष नगराध्यक्ष पदाची धुरा भूषविलेले कै. नानासाहेब विष्णू पाटील यांच्या जयंतीनिमित्त पालिकेच्या दोघ माध्यमिक शाळांमध्ये ५०-50 हजार ठेव म्हणून ठेवलेल्या व्याजातून दरवर्षी त्यांच्या जयंती दिवसानिमित्त गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्यात येते.
यावर्षीही त्यांच्या जयंतीनिमित्त दादासाहेब वसंतराव विष्णू पाटील औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज वसंतराव पाटील यांच्या हस्ते शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे मुख्याध्यापिका पुष्पलता ठोंबरे ,माजी नगरसेवक शिक्षक पालक संघाचे सदस्य शामकांत पाटील, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्पना ठोसरे, माजी उपनगराध्यक्ष नंदाबाई लोखंडे, सदस्य श्रीकांत वाणी बी.जी. भालेराव, जे.व्ही तायडे, यांच्या उपस्थितीत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थांमध्ये --
आ. गं. हायस्कूल सावदा -
इयत्ता सहावी - तुषार कोळी, योगेश चौधरी, तन्मय अजहर शहा फकीर,
इयत्ता सातवी - कार्तिक साळी, आदित्य सरोदे, फाल्गुन चौधरी,
इयत्ता आठवी - चेतन महाजन, मधुर तायडे, हर्षित नेमाडे, युनिक वाणी
इयत्ता नववी - साहिल तडवी, प्रथमेश पाटील, ईशांत कोळी
इयत्ता दहावी - भूषण कायदे, भावेश पाटील, यशवंत भारंबे,
इयत्ता अकरावी - सागर पाटील, दिव्या सरोदे, तनुजा चौधरी,
इयत्ता अकरावी कला - गायत्री लोखंडे, रिया लोखंडे,
इयत्ता बारावी सायन्स - वैष्णवी सैतवाल,
इयत्ता बारावी कला - मुबारिका बोहरी
या विद्यार्थ्यांना व
श्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिर सावदा -
इयत्ता सहावी पाचवी - हेरल नितीन चौधरी,
इयत्ता सातवी - कल्पना बेंडाळे, पूर्वा चौधरी, तमन्ना तडवी, देवयानी सपकाळे, देवयानी बेंडळे,
इयत्ता आठवी - डिंपल पाटील, ममता टोके, अंतरा कठोरे, स्वप्नाली वाणी, अनुष्का सोनवणे,
इयत्ता नववी - श्रावणी नेमाडे, रोशनी चौधरी, भाग्यश्री पुरभी, प्रेरणा सोनवणे, पूजा कुंभार
या विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात वितरण प्रसंगी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सीसी सपकाळे यांनी सांगितले की शाळेसाठी नानासाहेब हे हे दानशूर व्यक्तिमत्व होतं त्यांच्या जयंतीनिमित्त होत असलेला हा कार्यक्रम गरीब विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आहे त्यांच्या शैक्षणिक वस्तू होत असलेल्या तून व त्यांच्या केलेल्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी व आयुष्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन त्यांनी केले अध्यक्ष नंदाबाई लोखंडे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कल्पना ठोसरे यांनीही आपले विचार मांडले.
नानासाहेबांच्या कार्याचा अल्प परिचय एनसीसी ऑफिसर शिक्षक संजय महाजन यांनी विद्यार्थ्यांना करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक नंदू पाटील यांनी केले.
إرسال تعليق