प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावद्यात ११० फूट तिरंगा ध्वज उभारणीला सुरुवात
सावदा शहरातील बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून सुमारे २३ लाख रुपये खर्चून ११० फूट उंच तिरंगा ध्वज उभारणीचे काम सुरू झाले आहे.
सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ पासून या कामास सुरवात झाली. यावेळी शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख सुरज (बद्री) परदेशी, मनीष भंगाळे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता व्ही. के. तायडे, ज्यु इंजिनिअर हेमंत महाजन, फिरोज खान पठाण, शाम अकोले, बौद्ध युवा ट्रस्टचे वेडु लोखंडे, नाना संन्यास, वाघराज तायडे, प्रदीप करोशिया आदी उपस्थित होते.
१५ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होऊन येथे तिरंगा फडकेल, असे नियोजन आहे.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق