प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” (मिट्टी को नमन, वीरों को वंदन) हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत असून या अंतर्गत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन सावदा नगरपरिषदे मार्फत करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
मशाल रॅली –
वेळ :- सायंकाळी ६:३० वा.
ठिकाण :- श्री.आ.गं.हायस्कूल ते नगरपरिषद कार्यालय.
पंच प्रण शपथ - वेळ :- मशाल रॅली नंतर.
‘वसुधा वंदन’ अंतर्गत वृक्षदिंडी, अमृतवाटिका वृक्षारोपण.
वेळ :- सकाळी ८:०० वा.
सुरुवातीचे ठिकाण :- आ.गं. हायस्कूल.
आंतरशालेय स्पर्धा.
प्रभातफेरी व पथनाट्य.
वेळ :- सकाळी ७:३० वा.
ठिकाण :- आ.गं. हायस्कूल ते नगरपरिषद कार्यालय.
शिला फलक अनावरण आ. चंद्रकांत पाटील (विधानसभा सदस्य, मुक्ताईनगर मतदारसंघ) यांच्या शुभहस्ते
वेळ :- सकाळी ११:३० वा.
ठिकाण :- कै. नानासाहेब विष्णु हरी पाटील उद्यान (नगरपालिका संचलित दत्त मंदिर उद्यान).
ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन व सन्मानपत्र वितरण सोहळा
ठिकाण :- नगरपरिषद कार्यालय.
वरील कार्यक्रमांसाठी सर्व सावदा वासियांनी आवर्जून हजर राहण्याचे आवाहन सावदा नगर परिषदे तर्फे करण्यात आलेले आहे.
إرسال تعليق