निंभोरा प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील निंभोरा जि. प. कन्या शाळेत नुकताच "नाना-नानी" म्हणजे "आजी-आजोबा" दिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थीनींनी शाळेत आलेल्या आजी आजोबा चे "नानी तरे मोरनी को मोर ले गये, बाकी जो बचा काले चोर ले गये |" हे गाणे गाऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्याध्यापक हेमंत चौधरी यांनी आजी आजोबा याचे शब्द सुमननानी स्वागत केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगून प्रास्तविक केले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेलोडे यांनी आपल्या मनोगतातून आजी आजोबा च्या नातवांबद्दल केलेल्या कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आजी आजोबा म्हणून हसीना बी पिंजारी, फ़रीदाबी खान, शकीला मन्यार, उषाबाई बिऱ्हाडे, अरुण खरचे, शेख नबी शेख लाल, नीलकंठ बोरोले, साहेबराव पाटिल यांनी उपस्थिती दिली.
तसेच या कार्यक्रमाचे परिश्रम शिक्षिका हेमलता पाटील व पल्लवी राणे व त्यांना मदत शा. पो. आ. च्या स्वयंपाकी मदतनीस रंजना चौधरी, आशा पाटील यांनी केली.
إرسال تعليق