Khandesh Darpan 24x7

निंभोरा येथे शांतता समिती च्या सभेत अप्परजिल्हा पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी यांनी केले मार्गदर्शन

 



निंभोरा प्रतिनिधी


रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन ला गणेश उत्सवईद-ऐ-मिलाद कार्यक्रमानिमित्त गणेश उत्सव पदाधिकारी व मुस्लिम पंच मंडळाला अगदी उत्कृष्ट रित्या समजावून सूचना देऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आपण सुद्धा पोलीस आहात असे सांगून मुस्लिम बांधवाना व गणेश भक्तांना आपल्या मार्गदर्शन भाषणातून शुभेच्छा दिल्या.





सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



विशेष करुन गणपती विसर्जन च्या दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद ची महमद पैगंबर साहेबाच्या जन्मदिनाची मिरवणूक काढू असे खिर्डी निंभोरा मुस्लिम पंच मंडळाने जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक गवळी यांना आपला निर्णय सांगितला त्या बद्दल गवळी साहेबांनी त्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व कार्यक्रमाला मला येण्यास उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त केली.


कार्यक्रमाच्या सुरवातीला साहेबाचा व मान्यवराचा सत्कार करण्यात आला. गोपनीय शाखेचे स्वप्नील पाटील यांनी प्रास्तविक केले व त्यांना मदत कॉ. पो. अमोल वाघ यांनी केली. उपस्थित प्रल्हाद बोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकारी अप्पर पो. अधीक्षक गवळी साहेबां सोबत फैजपूर विभाग डी. वाय. एस. पी. कृणाल सोनवणे,  निभोरा पोलीस ठाण्याचे ए. पी. आय. गणेश धुमाळ, पो. ऊ. नि. काशिनाथ कोळंबे, पो. ऊ. नि. रा. का.  पाटील, तंटा मुक्ती चे अध्यक्ष डिगबर चौधरी, माजी अध्यक्ष कडू धोंडू चौधरी, प्रल्हाद बोंडे, ग्रामपंचायत सदस्य सतीष चौधरी, मनोहर तायडे, नितीन पाटील, निंभोरा मज्जीत चे मौलाना त्याच्या बरोबर युनूस खान, अमान खान, मुना पिंजारी, खिर्डी येथील मुस्लिम पंच मंडळी, पत्रकार काशिनाथ शेलोडे, खिर्डी रेभोटा येथील पत्रकार गाढे, प्रदीप महाराज, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळे शांतता समिती सदस्य, पोलीस होमगार्ड उपस्थित होते.



वरील एल्बम चा टीझर पाहण्यासाठी यावर क्लिक करा. आणि मोक्षदा म्युजिक का सबस्क्रइब करा.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم