प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
धनाजी नाना महाविद्यालय, फैजपुर हिंदी विभाग अंतर्गत हिंदी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 15 सप्टेबर, २०23 ते दिनांक 22 सप्टेबर, २०23 या कालावधीत हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, निबंध लेखन, सामान्य ज्ञान स्पर्धा, वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी सप्ताहाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
दि. 15/०9/२०23 रोजी रांगोळी स्पर्धा व मेंहदी स्पर्धा आयोजित करण्यात आली. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल भंगाळे व उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले, उपप्राचार्य डॉ. एस .व्ही जाधव यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ. सविता वाघमारे डॉ. सरला तडवी यांनी केले व मेहंदी स्पर्धेचे परीक्षण डॉ. राजश्री नेमाडे, डॉ. राजश्री पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कल्पना पाटील, डॉ. ईश्वर ठाकूर, डॉ.विजय सोनजे, डॉ. सतीश पाटील यांनी तसेच विद्यार्थी हर्षल बार्हे, हेमंत सपकाळे व हिंदी विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق