दसनूर प्रतिनिधी
दसनुर ता. रावेर येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या उमेश्वर महादेवाचा यात्रौत्सव पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी मात्र तो दोन दिवसांचा असणार आहे.
शुक्रवारी दि. १५ सप्टेबर, २०२३ रोजी यात्रौत्सव सुरू होऊन शनिवारी दि. १६ सप्टेबर, २०२३ रोजी बारागाडया ओढल्या जाणार आहेत. पोळ्याचा उत्सव म्हणून सालाबादप्रमाणे अगदी पारंपारीक पद्धतीने हा यात्रौत्सव साजरा केला जातो.
यात्रेवेळी गावोगावीचे लोक उमेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी येऊन आपल्या मनातील इच्छा बोलतात व ती पुर्णही होते ही भाविकांची मोठी श्रद्धा आहे .
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
यात्रौत्सवानिमित्त शनिवारी संध्याकाळी ५ वाजेला बारागाड्या ओढल्या जाणार आहेत. यात्रेत खेळणी तसेच विविध व्यावसायिकांची संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात.
यात्रौत्सव यशस्वीतेसाठी सरपंच सौ. भारती महाजन, उपसरपंच मयूर महाजन, पोलिस पाटील दिपक पाटील, महेश चौधरी, हेमंत चांदवे यांचेसह ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
إرسال تعليق