प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील कोष्टी वाड्यातील असलेल्या महादेव मंदिरात चौथ्या श्रावण सोमवारी महारुद्र अभिषेकाचे आयोजन केले आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोष्टी युवा मंच & कोष्टी महिला मंडळाने केले आहे.
मागील वर्षी या सामूहिक एक दिवसीय कार्यक्रमात २०- २५ भाविकांनी सहभाग घेतला होता. यंदाचा हा कार्यक्रम चौथ्या श्रावण सोमवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
या पवित्र महारुद्र पूजेला बसणाऱ्या नित्यसेवा, अभिषेक पात्र, तामण, पाण्याची बाटली, पाट, १०८ बेलपत्र, आसन, चमचा, तांब्याचा तांब्या, शिवलिंग, महामृत्युंजय यंत्र, जपमाळ व हळद- कुंकू, अष्टगंध, अक्षता, अत्तर, कापूर, जानव, शिवमूठ, मूग, भस्म, नारळ इत्यादी साहित्य घेऊन सकाळी ८ वा वेळेवर उपस्थित राहावे.
हा कार्यक्रम कोष्टी युवा मंच आणि कोष्टी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. तरी भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे.
إرسال تعليق