Khandesh Darpan 24x7

सावदा फैजपूर महामार्गावर खाजगी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक




 प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर (सावदा फैजपूर) मार्गावरील अपघाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आज संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सावदा शहरा जवळील साईबाबा मंदिराजवळ श्री आशीर्वाद ट्रॅव्हल ची खाजगी बस क्रमांक MH-16 Q.9986 आणि अवजड मालाने भरलेली ट्रक क्रमांक  MP-07 HB 4944 यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. 




सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



खाजगी बस मध्ये १८  प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बस चालक चौधरी नामक व्यक्ती आशीर्वाद हॉस्पिटल फैजपूर येथे दाखल असुन प्रवाशांपैकी अजंदा तालुका रावेर येथील तेरा वर्षीय बालक किरकोळ जखमी असल्याचे कळते.


या ठिकाणी नेहमी प्रमाणे अपघाताची शृंखला चालूच आहे. अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर (सावदा फैजपूर) रस्त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली असून याच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी अलीकडेच पत्रकारांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रसंगी तात्काळ रस्ता दुरूस्ती करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले होते. आश्वासनं अंती रस्ता डाग डूजी करणाला हात लावलाच असताना हा अपघात झाला. 



यावेळी सावदा पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. यावेळी  सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, गुप्त वार्ता विभाग देवेंद्र पाटील, यशवंत टाकळे, पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, गृह रक्षक दलाचे जवान यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. खाजगी जेसीबीच्या साह्याने खाजगी अपघातग्रस्त बस बाजूला करण्यात येत होती.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم