प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
तालुक्यातील निंभोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका ची सभा संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निंभोरा येथील कृषी तंत्रज्ञान विद्यालय येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली. संघटनेच्या रावेर तालुका सभेतील सदस्य आणि पदाधिकारी यांची उपस्थित संख्या पाहता यापुढील सभेसाठी सर्व पदाधिकारी तसेच सदस्य यांनी सक्रिय होऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून संघटनेसाठी कार्य करावे असे ठरवण्यात आले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
तसेच येथे दि. ३० ऑक्टोबर,२०२३ रोजी जळगाव येथे होत असलेल्या पुरस्कार व विमा वितरण या कार्यक्रमासाठी जाण्याबाबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे, ता. उपाध्यक्ष प्रभाकर महाजन, ता. सचिव इकबाल पिंजारी, जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे, सल्लागार प्रकाश पाटील, राजेश चौधरी (राज सर), प्रदीप कुलकर्णी, आनंदा भालेराव, रुपेश(जितू) इंगळे व सदस्य उपस्थित होते.
सदर सभेत आनंद भालेराव यांची तालुका सह-सचिव पदी तर राजेश चौधरी (राज सर) यांची तालुका प्रसिद्धी उपप्रमुख म्हणून कार्यकारिणीत निवड करण्यात आली व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
إرسال تعليق