Khandesh Darpan 24x7

वनोली साईबाबा मंदिरात आज महाप्रसादाचा कार्यक्रम - ५० हजाराच्या वर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता ...




बामणोद प्रतिनिधी  :  सुधीर कुळकर्णी 


यावल तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या श्री साईबाबा देवस्थान, वनोली या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झालेली असून घटस्थापने नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही यावर्षी आज रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी येत असून त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार रक्षाताई खडसे हे विशेष उपस्थित राहणार असल्याचे या मंदिराचे विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल व्यंकट चौधरी यांनी सांगितले.








वनोली हे गाव भुसावळ-फैजपूर रस्त्यावरील पाडळसे बामणोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मधे आहे या ठिकाणी शंभू महादेवाची पिंडीची स्थापना व दोन नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आलेले होते ते आजही तेवत आहेत एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी अक्षरशः साईबाबांनी दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी सांगतात. आजही हे नंदादीप जळताना दिसतात. 



या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आजपर्यंत युती शासन असताना तत्कालीन आमदार सुरेश जैन व आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळाला होता त्यानंतर खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास होण्यामागे स्वर्गीय कृषी मित्र माजी आमदार तथा खासदार हरिभाऊ जावळे यांचे खरे प्रयत्न आहे. त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे स्वर्गीय खासदार वाय. जी. महाजन सर, खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी यांनीही या मंदिराच्या जडणघडणीसाठी हातभार लावलेला आहे.




सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




यावर्षी मोठ्या प्रमाणावर श्री साईबाबा महाराजांची महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातूनच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश राज्यातूनही लोक या ठिकाणी महाप्रसादाला येतात व येतील असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. घटस्थापनेनंतर अष्टमीच्या दिवशी वनोली कोसगाव या छोट्याशा गावांमध्ये जळगाव जिल्हा भरातून नातेवाईक साईबाबा चे दर्शनाला येतात श्रद्धेने या ठिकाणी गोडेतेल साईबाबाला वाहिले जाते व काही भाविक या ठिकाणी आपल्या मुलांचे जाऊळही उतरवतात.


आज रविवार २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४० ते ५० हजार भाविक महाप्रसादाला भेट देतील असा अंदाज आहे या महाप्रसादांमध्ये उडदाच्या डाळीचे वडे, खीर, गंगा फळ ची भाजी आणि चकरी  या सर्वांसाठी साईबाबाच्या प्रांगणातच तयार केल्या जातात. रात्री उशिरापर्यंत या महाप्रसादाची सांगता होते या कार्यक्रमाला यावल, रावेर तालुक्याचे प्रांत अधिकारी, तालुक्याचे तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, फैजपूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ, आरोग्य विभागाचे स्टाफ, वीज मंडळाचे अधिकारी हे आपापले कामगिरी बजावतात.


महाप्रसादानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक २३ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी साईबाबा मंदिराची यात्रा असते. शंभर फूट उंच देवकाठी ही मोर नदीवर नेऊन धुतली जाते व तिथून तिला सजवून वाजत गाजत वाजंत्री च्या साह्याने गावात आणून मंदिरापर्यंत पोहोचवली जाते. संध्याकाळी बारा गाड्या असतात व बारा गाड्या नंतर काही दोन लोकनाट्य ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी ठेवले जातात.


श्रीक्षेत्र वनोली साईबाबा मंदिराच्या महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातून भाविकांनी मोठ्या संख्येने शिस्तीने व शांततेने हजेरी लावावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट विश्वस्थ तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी सह वनोली साईबाबा मंदिर चे भगत आत्माराम सपकाळे, ग्रामस्थ आणि सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.




हि बातमी आपण वाचाल 

सावदा शहरातील सर्वात पहिला "माऊली दातांचा दवाखाना",बस स्टँड च्यावर, सावदा. 
(डॉ. सोपान खडसे मोबा. ९३७१९९३१९४)  

तसेच 

"मोरया दातांचा दवाखाना", लक्ष्मी कॉम्प्लेक्स, बाबू शेठ पेट्रोल पंप समोरसावदा.
 (डॉ. तुषार पाटील, मोबा. ९४२३४८१०३३

यांचे सौजन्याने




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم