Khandesh Darpan 24x7

पत्रकारांसह मान्यवरांचा फैजपूर डी.एन.कॉलेज येथील कवी संमेलनात सन्मान




प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 






डायमंड डिजिटल हबच्या वतीने फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे सुप्रसिद्ध कवी तथा शिक्षक स्व. युसूफ सायकलवीगांधी जयंती निमित्त दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ वाजता (मुशायरा) कवी संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




कवी संमेलनाचे कन्व्हेनर शाहिस्ता हैदर, अल्कवी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अय्युब खान सर, अबुजर शेख यांनी सदर कार्यक्रम आयोजित केला होता.


या कवीसंमेलनाची सुरवात पवित्र कुरान पठणने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी होते. दीप प्रज्वलन सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हाजी हारुन शेठ सह शिवसेना अल्पसंख्याक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अफसर खान व मान्यवरांनी केले. 




यानंतर महात्मा गांधी व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस आ.शिरीष चौधरी यांनी पुष्पमाला अर्पण केली. यानंतर त्यांच्या हस्ते या कवीसंमेलनात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व पत्रकारिता सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे महीला अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे रावेर तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार युसूफ शाह व सावदा शहर अध्यक्ष फरीद शेख, बी.के.सैय्यद सर, अर्षद पठाण सर, शेख जावेद सर, सलाउद्दीन जाहिद, अब्दुल रऊफ खान यांचे शाल पुष्पगुच्छने सत्कार करून सन्मानपत्र देण्यात आले. 


या कवी संमेलनात रागीब ब्यावली, हबीब मंजर, इमरान फारस, प्रियंका सोनी पर्यत, नौशाद ब्यावली, शाहिद मना-फट, असलम तनवीर, साबीर मुस्तफा आबादी, रईस फैजपुरी, चांदनी जोहरी, शफिक रहमानी, बाशीद उमर, ऐैफाज जाहीद या सुप्रसिद्ध कवी यांनी आपल्याला (शेरो,शायरी) तथा गजल, कवितांनी  याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सावदा, चिनावल, फैजपूर, रावेर, रसलपुर, मारूळ, न्हावी, यावल येथील रसिकांची मने जिंकली.





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم