Khandesh Darpan 24x7

कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त आणि तिथी



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


नवरात्रौत्सव आणि विजयादशमीची सांगता झाल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे. 


कोजागिरी पौर्णिमा आपल्या देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोजागिरीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोजागिरीची पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते.


या वर्षी कोजागिरी पौर्णिमा शनिवारी २८ ऑक्टोबरला (शनिवारी) साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून ही ओळखली जाते. या दिवशी चंद्राचे टपोरे चांदणं आणि साजरे रूप पहायला मिळते. या दिवशी चंद्राचे सर्वात सुंदर रूप दिसते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.


आजच्या लेखात आपण कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त आणि कोजागिरीचे महत्व जाणून घेणार आहोत.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त कधी ?


अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. २८ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे. ही पौर्णिमा २९ ऑक्टोबरला सकाळी १ वाजून ५३ मिनिटांनी संपेल.


परंतु, पौर्णिमेच्या चंद्रोदयाची वेळ आणि उदय तिथी दोन्ही २८ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी येत असल्यामुळे कोजागिरी पौर्णिमा २८ ऑक्टोबरलाच साजरी करण्यात येईल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे.



कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी पूजेचा मुहूर्त कधी ?


कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची आराधना आणि पूजा केली जाते. कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी ३ मुहूर्त आहेत. या तीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त हा रात्री ८:५२ ते १०:२९ पर्यंत आहे. त्यानंतरचा दुसरा मुहूर्त हा १०:२९ पासून ते १२:०५ पर्यंत आहे, त्यानंतर तिसरा मुहूर्त हा १२:०५ पासून ते १:४१ पर्यंत आहे.


या तिन्ही मुहूर्तांपैकी कोणत्याही एका मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करू शकता. ही पूजा झाल्यानंतर लक्ष्मी देवीला दूध किंवा खीरचा प्रसाद दाखवला जातो. ही खीर किंवा दूध चंद्रप्रकाशात ठेवले जाते आणि नंतर, त्याचे सेवन केले जाते.



धार्मिक महत्त्व


या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र, बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वतः सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात.


ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.


विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा-अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासना केली जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. 


श्रीकृष्ण १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात वृंदावनमध्ये (व्रजमंडळ) भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून वैष्णव संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात.श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना केली जाते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


सकाळ 26 October 2023

Post a Comment

أحدث أقدم