Khandesh Darpan 24x7

खासगी बसचे अव्वाच्या सव्वा तिकीट? तक्रारीसाठी 'व्हॉट्सअॅप हेल्पलाइन'; तक्रार कशी करणार?

 



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   


जादा भाड्याविरोधातील तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’ जारी करण्यात आला आहे. आरटीओकडून व्हॉट्स-अपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.


प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित करून दिलेल्या कमाल तिकीट दरापेक्षा अधिक तिकीट वसूल करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांची तक्रार आता प्रवाशांना थेट परिवहन विभागाच्या ‘८२७५३३०१०१’ या ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’ क्रमांकावर करता येणार आहे. तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने या वर्षी प्रथमच व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे तक्रार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.




दिवाळीत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन खासगी बस चालक अव्वाच्या सव्वा तिकीटदर आकारतात, अशा तक्रारी केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व खासगी बस मालकांची नुकतीच आरटीओ कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ‘आरटीओ’कडून बसमालकांना दरवाढीबरोबरच प्रवासी, बसची सुरक्षितता, चालकांचे आरोग्य, स्वच्छता आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.



यापूर्वी आरटीओ प्रशासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दर वर्षी देत होते. नागरिकांना तक्रारीसाठी ई-मेल आयडी आणि हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देत होते. अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी होऊनही केवळ तक्रार येत नाही, असे कारण पुढे करीत आरटीओ कडून कारवाई केली जात नव्हती. यंदाच्या नागरिकांना सोयीची अशी हेल्पलाइन सेवा उपलब्ध करून दिल्याने जास्त तक्रारी प्राप्त होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




नियम काय?

एसटी बसच्या तिकिटाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक दरवाढ (एसटीचे तिकीट १०० रुपये असल्यास खासगी ट्रॅव्हल्स कंपनी कमाल १५० रुपये तिकीट आकारू शकते.) करू नये, असा परिवहन विभागाचा आदेश आहे. त्या अनुषंगाने खासगी ट्रॅव्हल्स चालकांना एसटीच्या तिकिटदराचा तक्ता दिला जाणार आहे. तरीही जादा तिकीट आकारल्यास संबंधित बस मालकाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मार्गांवरील बसची तपासणी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून चार पथके तैनात केली जाणार आहेत.



प्रवाशांना आवाहन

सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की. जादा भाडेदर आकारणीबाबत प्रवाशांच्या तक्रारी असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या ८२७५३३०१०१ या व्हॉट्स अॅप क्रमांवर अथवा buscomplaint.rtopune@gmail.com या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना तक्रारीसंबंधी खालीलप्रमाणे तपशील देण्यात यावा.


तक्रार कशी करावी ?

१. तक्रारदाराचे नाव

२. मोबाइल क्रमांक

३. प्रवास मार्ग

४. बस क्रमांक

५. बस प्रकार (एसी, नॉन एसी, स्लिपर वगैरे)

६. बसचा फोटो

७. तिकीटाचा फोटो

(तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.)

नागरिकांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावर आवश्यक माहिती आणि पुराव्यासह तक्रार करावी. जादा भाडे आकारणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल.

- संजीव भोर (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे)


‘आरटीओ’ची व्हॉट्सअॅप हेल्पलाइन :  ८२७५३३०१०१
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Updated: 8 Nov 2023, 1:12 pm



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा





Post a Comment

أحدث أقدم