Khandesh Darpan 24x7

सावदा वासियांनी वाढीव घरपट्टी संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले निवेदन



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका तर्फे शहरवासीयांना आकारण्यात आलेली घरपट्टी कर हे चुकीचे व जास्तीचे असून, न. पा. कडून शहरात योग्यती मुलभूत सुविधांचा अभाव असताना अशा प्रकारे कर स्वरुपी सर्वसामान्य माणसांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यात यावे. अशी जनहितार्थ मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना शहरातील समाजसेवक सोहेल खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, युसूफ शाह, फरीद शेख, गौसखान सर, शाईस्ता सर, मनिष भंगाळे, निसार अहमद, इरफान मियां यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष अफसर खान हे देखील उपस्थित होते.





निवेदनात म्हटल्याप्रमाणे, येथील नगरपालिकेत प्रशासकीय राजवट आल्यापासून शहरात अस्वच्छतेच्या प्रकरणात वाढ झाली आहे. शहरातील गटारींची साफसफाई सह कचरऱ्याची उचल वेळेवर होत नाही. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात प्रत्येक गल्ली बोळात तथा नवीन हद्दीतील परिसरात (सुगंगा नगर, सोमेश्वर नगर इ.) डांस, मच्छरांचे साम्राज्य पसरले असून शहरात लोकांचे आरोग्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. 



शहरातील अनेक रहिवासी भागात पाईपलाईन असून पिण्याचे पाणी येत नाही. तसेच नविन हद्दवाढ झालेल्या क्षेत्रांमध्ये समस्याग्रस्त नागरिकांची तक्रारी प्राप्त झाल्यावर देखील या नगरपरिषदेने वाजवी मुलभुत सुविधा पुरविण्यासाठी आज पावतो कोणतेच प्रयत्न केले नसतांना सन २०२३-२४ ते पुढील पांच वर्षासाठी शहर सह नविन भागामध्ये अवाजावी स्वरुपात आकारलेले कर सह न.पा. हद्दीतील कर आकारणी सर्वप्रथम पुर्णतः रद्द होवून पुन्हा नियमानुसार योग्यती कर आकारणी होवून मिळावी जेणेकरुन सावदा वासियांचे आर्थिक शोषण थांबेल. तसेच शहरात एकूण ७ हजार करदात्यांना सदर प्रकारे कराची आकारणी केल्याने शहरवासीयांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे.



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,




तरी सदर नगरपालिका मुक्ताईनगर मतदारसंघातील असल्यामुळे आमदारांनी याकडे लक्ष देऊन वरणगाव नगरपालिकेच्या धर्तीवर तात्काळ सदरील गैरवाजवी आकारण्यात आलेल्या कराला इस्थागिती मिळवून द्यावी. अशी मागणी केली आहे.




अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم