Khandesh Darpan 24x7

सावदा येथील नवनिर्मित ग्रामीण रुग्णालयास राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देणेसाठी चे उपोषणास तूर्त स्थगिती...माजी नगराध्यक्ष - राजेंद्र चौधरी



प्रतिनिधी :  राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी 


सावदा ता. रावेर येथील नगरपरिषदेने सावदा ग्रामीण रूग्णालयास "राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय" असे नांव देणेत यावे अशा आशयाची ठराव पारीत केलेला आहे. रूग्णालयास नगरपरिषदेने जागा हस्तांतरण करतेवेळी सदरील ठरावात "राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय" देणेबाबतचा स्पष्ट उल्लेख करून ठराव पारीत केलेला आहे.  





दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकिय रूग्णालय जळगांव कार्यालयाकडे नांव देणेबाबत विनंती करणेत आलेली होती. त्या पत्रावर सावदा नगरपरिषदेने स्वंयस्पष्ट अहवाल सुध्दा दिलेला आहे. तरी सुध्दा आजपावेतो रूग्णालयास नांव देणे संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही.  त्यामुळे आठ दिवसाच्या आंत आपण योग्य ती कार्यवाही न केल्यास दि. ०७ नोव्हेंबर २०२३ पासून सावदा ग्रामीण रूग्णालयासमोर आमरण उपोषण करणेत येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यालयाची असेल असे पत्र मा. नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकिय रूग्णालय जळगांव यांना दिले होते तसेच या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव,  उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग फैजपूर, तहसिलदार रावेर, सहाय्यक पोलिस निरिक्षक, सावदा पोलिस स्टेशन यांचे कडे सादर केलेली होती. 



सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील 
एकमेव व्यावसायिक संगणक 
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,



परंतु उपरोक्त शासनाकडून / वरीष्ठ कार्यालयाकडून विषयांकित प्रकरणी कार्यवाहीचे आदेश प्राप्त झालेवर त्यानुसार उचित कार्यवाही करण्यात येईल. तरी आपण सावदा ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणास बसू नये, हे विनंती पत्र आलेले असल्याने उपोषणास तूर्त स्थगिती देण्यात आली असल्याचे माजी नगराध्यक्ष - राजेंद्र चौधरी यांनी खान्देश दर्पण 24x7 शी बोलतांना सांगितले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم