भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज या प्रकरणावर निर्णय दिला आहे.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. पुढच्या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी पावले उचलावीत, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.
कलम ३७० ही तात्पुरती तरतूद आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. जम्मू-काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्व नव्हते, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
सर्वोच्च न्यायालयाने जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करण्याचे निर्देश दिले आहेत.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राजकिय आणि मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवूडच्या दिग्गजांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देत निर्णयाचे स्वागत केले आहे.
काश्मिर फाईल्स फेम अभिनेते अनुपम खेर यांनी कलम 370 रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कलम 370 रद्द करणे आवश्यक होते. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आता, मला विश्वास आहे की त्यावरील सर्व वादविवाद संपले असतील. असं त्यानी या व्हिडिओत म्हटलं आहे.
तर दुसरीकडे प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही या निर्णयावर भाष्य करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेयर करत लिहिले, "कलम 370 रद्द केल्याबद्दल सर्वप्रथम मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अभिनंदन आणि आभार मानतो. न्यायाचा अधिकार कायम ठेवल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचेही आभार मानतो.
न्यायमूर्ती एस सी कौल यांनी अत्यंत महत्त्वाची शिफारस केली आहे. गेल्या 75 वर्षांतील सर्व नरसंहारांसाठी भारताने TARC स्थापन करण्याची वेळ आली आहे.
डायरेक्ट अॅक्शन डे पासून ते 2020 च्या दिल्ली दंगलीपर्यंत....आता वेळ आली आहे की भारताने नरसंहार आणि नागरिक #RightToLife ला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतला होता. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज या प्रकरणावर निर्णय दिला आहे.
कलम 370 काय आहे? जाणून घेणे साठी येथे क्लिक करा
Updated on: Dec 11, 2023 | 12:52 PM
Sakal 11 December 2023, 3:40 pm
إرسال تعليق