पूर्वी पासून अंकलेश्वर बुन्हानपुर राज्यमार्ग क्रमांक-4 असे वापरात आहे. आणि ते फैजपुर सावदा- रावेर ते चोरवड महाराष्ट्राची सीमा असे बुरहानपुर असे जात आहे. तसेच सावदा शहर हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात तिघ राज्यांना जोडणारा महामार्गावरील महत्वाचे शहर आहे. रावेर सावदा फैजपुर परिसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध आहे. असे असून सुद्धा या दोन्ही शहर वासीयांना दळणवळण व व्यवसायापासून वंचित व दूर करण्यात येत आहे असे अन्याय होऊ नये म्हणून ठिया आंदोलन करण्याचे निवेदन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना राजेंद्र चौधरी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भा. ज. पा. तथा माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद सावदा यांनी दिले आहे.
तसेच केळी माल निर्यात करण्यासाठी रावेर सावदा-फैजपुर येथे ट्रक लोडींग ट्रान्सपोटिंग केळी निर्यात करण्याचे कार्य सदैव राहणार आहेत. असे असताना सुद्धा रावेर लोकसभा विधानसभा मतदार संघावर चौपदरीकरण रस्त्याचे भूसंपादन वेगळ्या दिशेने होत असून सर्व शेतकरी बांधवांच्या सहनशिलतेच्या अंत आहे. चौपदीरकरण रस्ता हा रावेर व सावदा फैजपुर या शहरातून किंवा शहराला लागून झाला पाहिजे हि मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात इशारा सुद्धा या वेळी राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी जळगाव, खासदार रावेर लोकसभा मतदार संघाच्या रक्षताई खडसे, खासदार, जळगाव लोकसभा मतदार संघ उन्मेशदादा पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव, पोलिस अधीक्षक जळगाव, कार्यकारी अभियंता सा. बा. उत्तर विभाग जळगाव यांना दिलेली आहे.
إرسال تعليق