प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपरिषद हद्दीत कचरा संकलनाचे काम सावदा नगरपरिषदेमार्फत केले जात होते. सद्यस्थितीत सदरील कचरा संकलनाचे काम एस. आर. ग्रीनवे एम्पायर, नाशिक यांचेमार्फत केले जात आहे.
सदर ठेकेदाराकडून सावदा शहरातील कचरा १०० टक्के संकलीत केला जात नसल्याबाबत नागरीकांकडून वारंवर तक्रारी नगरपरिषदेकडे येत असतात. तसेच मी यापूर्वी ब-याच वेळा कचरा संकलीत होत नसलेबाबत तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु कचरा सकलनाच्या कामात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
ख्वाजानगर भागात कच-याचे ढीग पडलेले असतात. प्रत्येक वेळी नगरपरिषदेकडे तक्रार केल्यावर सुध्दा कचरा उचलला जात नाही. सदर ठेकेदारास १०० टक्के कचरा उचलणेबाबत ठेका देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठेकेदार जर १०० टक्के कचरा उचलत नसेल तर त्यांचे कचरा संकलनाचे बिल देण्यात येवू नये अथवा त्यास शास्ती लावणेबाबत आपले स्तरावरून कार्यवाही व्हावी असे निवेदन माजी नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी आज येथील प्रशासकीय अधिकारी सचिन चोलके यांना दिले आहे.
إرسال تعليق