धनाजी नाना महाविद्यालयाच्या गेट समोर कामबंद आंदोलन
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अध्यक्ष आर. बी. सिंह यांच्या नेतृत्वात 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत कामबद आंदोलन करत संप पुकारला आहे.
संपात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, पदोन्नतीसाठी 10-20-30 या फॉर्म्युला नुसार कर्मचाऱ्यांना त्वरित पदोन्नती देण्यात यावी, नवीन पदभरती त्वरित करण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत, या बाबतीत संघटनेचे सचिव पावन आजालसोंडे यांनी शासनावर राग व्यक्त करत सांगितले की अनेक वर्षांपासून नवीन नोकर भरती केली नसल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर त्याचा खूप वाईट परिणाम होत असल्यामुळे शासनाने नवीन पद भरती त्वरित करावी व इतर मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
आंदोलनात फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले असून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात व सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक शाखेचे अध्यक्ष आर. आर. जोगी व उपाध्यक्ष आर. वाय. तायडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीस इतर सर्व संघटनांचा बिनशर्त पाठिंबा मिळत आहे.
إرسال تعليق