निंभोरा प्रतिनिधी
येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना किराणा किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच खरे समाधान असल्याचे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले व दिव्यांग बांधवांचा सत्कार करून गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थांनी दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आपण समाजाचे देणे लागतो या उदार हेतूने दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मदत करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन करण्यात आले. निंभोरा ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या निकषानुसार दिव्यांगांच्या संदर्भातील योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांच्या संदर्भात स्पष्टीकरण देताना ग्रामपंचायत प्रशासनाने निंभोरा येथील ७५ दिव्यांग बांधवांपैकी ४३ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ५००० रुपयाचे किराणा किट वाटप करण्यात आले.
रावेर तालुक्यातील प्रथम दिव्यांग वाचनालय बांधकाम सुरू असून लवकरच त्या वाचनालयाचे लोकार्पण होऊन त्यात त्यांच्या ज्ञानात भर पडेल असे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले. तसेच यापुढे शासनाच्या नियमानुसार निंभोरा ग्रामपंचायत प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
सावदा शहरातील आणि सावदा शहर परिसरातील
एकमेव व्यावसायिक संगणक
(Special Tally - Off Line Education) शिक्षण इन्स्टिट्यूट,
कार्यक्रमात सुनील कोंडे, राजीव बोरसे, मनोहर तायडे या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे, सौ मंदाकिनी बऱ्हाटे प्रशांत पाटील, धनराज राणे, अकील खाटीक, गुरुदास बराटे, गंगाराम चिंचोले, सचिन चौधरी, सुरेश बोरसे, रवींद्र महाले, नितीन पाटील, अनिल टेलर, राहुल सोनार, सदाशिव कोळी व विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजू बोरसे, भास्कर महाले यांनी केले, तर आभार मनोहर तायडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
إرسال تعليق